नाशिक ( प्रतिनिधी ) – कांदा उत्पादनखर्चात झालेली वाढ, स्थिर किंवा कमी होणारे उत्पादन शेतकऱ्यांसाठी चिंतेच्या प्रमुख बाबी आहेत. अलीकडेच बाजारात आणलेले ‘महाधन क्रॉपटेक’ खत फायदेशीर ठरत आहे,ज्यामुळे कांद्याच्या पिकात १० टक्केहून अधिक वाढ नोंदवली आहे. ‘महाधन क्रॉपटेक’ मधून कांद्याच्या पिकासाठी आवश्यक असलेले सर्व मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म पोषक अन्नद्रव्ये पुरविली जातात. ‘महाधन क्रॉपटेक’ ला कांद्याचे पीक सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रगतिशील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
देवळा येथील शेतकरी एकनाथ देवमण म्हणाले “महाधनतर्फे माझ्या शेतामध्ये कांदा पिकावर क्रॉपटेक खताचे प्रात्यक्षिक घेतले होते. या खतामुळे एकसारख्या आकाराचे कांदे मिळाले कांदाचाळीमध्ये जवळजवळ ७ महिने टिकून राहिला व कांद्याची प्रत देखील चांगली मिळाली यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळाला. महाधन क्रॉपटेकच्या एका गोळीमध्ये सर्व पोषक अन्नद्रव्ये असल्याने ( एनपीके सोबत मॅग्नेशियम, गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्ये) माझा एकरी खतांवरील खर्चदेखील कमी झाला”
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ. के. ई.लवांडे यांनीही महाधन क्रॉपटेकचा आढावा घेतला. ‘‘रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे भारतातील जमिनीचे आरोग्य बिघडले असून तिचा सातत्याने ऱ्हास होत आहे. म्हणून कांद्याच्या पिकाची उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच निसर्गाला हानी न पोहोचवणारे समाधान उपयोगात आणण्याची तातडीची गरज आहे. म्हणून ‘महाधन क्रॉपटेक’ द्वारे कांद्याच्या वाढीव उत्पादनासाठी आवश्यक मात्रेच्या साह्याने समतोल पोषक अन्नद्रव्ये पुरविले जातात”. नरेश देशमुख, मुख्य – सेल्स आणि मार्केटिंग (सीएनबी), ‘महाधन क्रॉपटेक’ ला मिळालेल्या प्रतिसादामुळे आनंदी आहेत.‘‘एसटीएल शेतकऱ्यांसोबत नेहमीच उभी राहिलेली आहे. कांद्याचे पीक घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याची गरज असेल तेव्हा ते मिळेल.’’ असे ते म्हणाले.