जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे रविवारी १७९ जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे त्यातच आता आरोग्य यंत्रणेतील प्रमुख डॉक्टरांसह सहा जण बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन.एस. चव्हाण यांचेसह एक लिपिक व जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन प्रमुख डॉक्टर तसेच २ सीएमओ बाधित झाले आहेत. आमदार गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील हे कोरोनाबाधित झालेले आहे. आ. राजूमामा भोळे आणि माजी महापौर सीमा भोळे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीही त्यांनी ही खबरदारी म्हणून स्वतःला कोरोन्टाईन करून घेतले आहे.
सामान्य नागरिकांनी काळजी घेण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली असून प्रत्येकाने सार्वजनिक जागी वावरत असताना मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे गरजेचे झाले आहे.