जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात कोरोनाने आता हातपाय पसरले असल्याचे आज स्पष्ट झाले आहे जळगाव शहरासह भुसावळ व चाळीसगाव तालुक्यात कोरोना रूग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविली आहे.
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात १७९ कोरोना रूग्ण आढळून आले जळगाव शहरात -६४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-७३, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-२, धरणगाव-१, जामनेर-५, रावेर-२, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर -२, बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५७८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४७३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून १६ रुग्ण उपचार घेवून घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.