जळगांव ( प्रतिनिधी ) – शहराजवळील कुसुमब्याच्या स्वामी समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसीकरण आजपासून सुरु करण्यात आले आहे.
तालुका काँग्रेस कमिटीच्या मागणीची आरोग्य विभागाने दखल घेतल्याने आजपासून श्री.स्वामी समर्थ विद्यालय कुंसुंबा येथे १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींना लसीकरणला सुरुवात. करण्यात आली यावेळी प्रमोद गंगाधर घुगे ( ग्रा.प.सदस्य ), प्रा. भाऊसाहेब सोनवणे, डॉ. संजय चव्हाण ( आरोग्य अधिकारी, जळगांव तालुका ) , डाँ इरेश पाटील, डॉ.चेतन अग्निहोत्री, डाँ विकास जोशी, डाँ जयश्री सोनार, डाँ सुष्मा महाजन , मुख्याध्यापिका दीपाली भदाणे, प्रा.हेमंत सोनार, प्रा. सुनील ढाकणे यांच्यासह सर्व आशाताई व पदाधिकारी उपस्थित होते.आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेवुन १५ ते १८ वयोगटातील मुलांमुलींना लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल संस्थेने आभार व्यक्त केले.