जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरलेल्या ६ मोटारसायकली धरणगाव पोलिसांनी २ आरोपींकडून जप्त केल्या आहेत .
पाळधी पोलीस चौकीत ३ डिसेंबर रोजी योगेश तांबट ( रा – कांचननगर , जळगाव ) यांनी त्यांची मोटारसायकल ( क्र – एम एच १९ – बी एस ८५९२ ) चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती. या चोरीच्या तपासात संभाजी बाळू पाटील ( वय २० , रा सातारने , ता – धुळे ) व निलेश रवींद्र पाटील ( रा – सबगव्हाण, ता – अमळनेर ) या आरोपींना पकडले आहे. त्यांनी चोरलेली योगेश तांबट यांची मोटारसायकल या आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आली आहे . या आरोपींनीच आणखी ५ मोटारसायकलींच्या चोरीचीही कबुली दिली आहे, त्या त्यांनी पाळधी , धरणगाव , अमळनेर परिसरातून चोरल्याचे सांगितले . एम एच १९ – डी एन -६४३० , एम एच १९ – बी बी – ८७५६ , एम एच १९ – ए एल २१ ४७ , एम एच १९ – बी एस ८५९२ असे या मोटारसायकलींचे क्रमांक आहेत . या क्रमांकांच्या मोटारसायकली मालकांनी ओळख पटवून घेऊन जाण्यासाठी पाळधी पोलीस चौकीत संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे .
पो. नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स .पो. नि. गणेश बुवा , हे कॉ गजानन महाजन , विजय चौधरी , अरुण निकुंभ , संजय महाजन , उमेश भालेराव , अमोल सूर्यवंशी , ज्ञानेश्वर बाविस्कर , किशोर चन्दनकर यांच्या पथकाने या चोऱ्यांचा छडा लावला .