• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१६ कृषी अधिकाऱ्यांनी शासनाला ५० कोटींमध्ये गंडवत १४७ शेतकऱ्यांचे पैसेही हडपले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 7, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0

नाशिक ( प्रतिनिधी ) – 16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना व शासनालाही सहा वर्षांत सुमारे ५३ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावला आहे. एका शेतकऱ्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तेव्हा सखोल चौकशी सुरू झाली. चित्रपटाला साजेलसे असे हे प्रकरण आहे.

पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे गावाचे शेतकरी योगेश सापटे यांनी शासनाच्या विविध योजनांना मंजुरी मिळाल्याचे पाहिले. तशा निविदा निघाल्या. त्यांनी 2011 मध्ये अशा योजनेत कामे मिळावीत म्हणून अर्ज केला. त्यासाठी सापटे यांच्याकडून निविदा भरून घेतली गेली . 100 रुपयांच्या कोऱ्या स्टँपपेपरवर तिकीट लावलेल्या कोऱ्या 50 पावत्या तसे कोऱ्या चेकवर सह्या घेण्यात आल्या. या साऱ्याचा गैरवापर केला. सापटे यांना शेतीची कामे दिली. मात्र, त्यांच्या खात्यावरून 2011-2017 या काळात परस्पर 3 कोटी 17 लाख 4 हजार 504 रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे इतर 147 शेतकऱ्यांना गंडवण्यात आले आहे.

कृषी अधिकाऱ्यांनी एकीकडे शेतकऱ्यांना फसवले. दुसरीकडे शासनाच्या विविध योजनांचा निधी फस्त केला. शेतकरी सापडे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागितली. या घोटाळ्याचे पुरावे सादर केले. न्यायालयाने हे गंभीर असल्याचे सांगत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हा गुन्हा मोठा आहे. त्याला मोठे मनुष्यबळ लागणार आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे तपासासाठी नाशिकच्या स्थानिक पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

कृषी अधिकारी शीलानाथ पवार (रा. मानूर, ता. कळवरण), सरदारसिंग राजपूत (रा. चाळीसगाव, जि. जळगाव), एम. बी. महाजन (रा. ता. पेठ), अशोक घरटे (रा. सागुडे, जि. धुळे), विश्वनाथ पाटील (रा. परधाडे, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. कृषी सहायकांमध्ये राधा सहारे (रा. कुकडणे, ता. सुरगाणा), प्रतिभा माघाडे (रा. दिंडोरी) यांचा समावेश आहे. कृषी पर्यवेक्षकांमध्ये किरण कडलग (रा. जवळे कडला, ता. संगमनेर), मुकुंद चौधरी (रा. उंबरी, ता. राहुरी), दिलीप वाघचौरे (रा. सोलापूर) यांचा समावेश आहे. अन्य संशयितांमध्ये दिलीप फुलपगार, दीपक कुसळकर, विठ्ठल रंधे, संजय पाटील, नरेश पवार, दगडू पाटील यांचा समावेश आहे. या साऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


 

 

Tags: #nashik #maharashtra
Previous Post

धनगर समाज महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप धनगर तर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश बागुल

Next Post

16 महिन्यांच्या मुलीवर बापाकडूनच अत्याचार करून हत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

16 महिन्यांच्या मुलीवर बापाकडूनच अत्याचार करून हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026
शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
क्राईम

शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

September 26, 2026
दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर
क्राईम

दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

September 26, 2026
अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा
क्राईम

अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून अत्याचार; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

September 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव

September 26, 2026
शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

September 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon