पाचोरा ( प्रतिनिधी ) – नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाळ २९ डिसेंबररोजी पूर्ण झाल्यानंतर मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांचे हस्ते राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
२९ डिसेंबररोजी मुख्य अधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा सत्कार केला होता. आज राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांचे हस्ते प्रशासक शोभा बाविस्कर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटनेते संजय वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सभागृहातील पाच वर्षातील कार्यकाळाचा आढावा घेताना माजी आमदार दिलीप वाघ यांचे नेतृत्वात राष्ट्रवादीच्या सर्व सभासदांनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे सांगितले. नगरपरिषदेची त्रिशंकू अवस्था असताना भक्कम विरोधक म्हणून कार्य करतांनादेखील शहराच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षाकडून घेतल्या गेलेल्या योग्य निर्णयांना पाठिंबा देत सर्वतोपरी सहकार्य केले अयोग्य निर्णयांना तितक्याच परखडपणे राष्ट्रवादीने विरोध केल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी राष्ट्रवादीने सभागृहात केलेल्या कार्याची स्तुती करताना राष्ट्रवादीने नेहमीच विकास कार्याला पाठिंबा देऊन उत्कृष्ट सहकार्य केल्याचेदेखील सांगितले. राष्ट्रवादी तालुकाप्रमुख आणि नगरसेवक विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .
.यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक भूषण वाघ, सुचेता वाघ, रंजना भोसले, नीलिमा पाटील, वासुदेव महाजन, विकास पाटील, अशोक मोरे, बशीर बागवान यांचेसह राष्ट्रवादीचे पी. डी. भोसले, शरद पाटील, सुनील महाजन, सुदर्शन महाजन, संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेच्या शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकामसह सर्व विभागातील प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रकाश गोसावी, अभियंता मधुकर सुर्यवंशी, दत्तात्रय जाधव, रोखपाल सुधिर पाटील, राजेंद्र शिंपी, ललित सोनार, किशोर पाटील यांचेसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.