जळगाव ( प्रतिनिधी ) – एमआयडीसीत अवैध बायोडिझेलचा साठा करुन चोरटी विक्रि करणार्या तिघांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला स्थानिक गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे.
दानिश शेख अन्वर शेख ( वय २३) , शोएब खान ( वय ३३, रा दोघे रा. मास्टर कॉलनी,जळगाव ) व अली दय्यान अली अब्बास (वय ४३ रा. बिलाल चौक तांबापुरा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन वाहने व ६८ हजार ८०० रुपयांचे बायोडिझेल असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसीत एम.एच. १९ एस. ५७१५ या वाहनाव्दारे बायोडिझेलची चोरटी विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरिक्षक अमोल देवरे, सुनील दामोदरे, महेश महाजन, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पंकज शिंदे, हेमंत पाटील, विजय चौधरी व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो उ नि अमोले मोरे,पो उ नि दिपक जगदाळे, पो ना मुदस्सर काझी, योगेश बारी यांच्या पथकासोबत कारवाई केली. एमआयडीसीतील फातेमारनगर परिसरात एका कंपनीजवळ मोकळ्या जागेत वाहन उभे करुन तीन जण बायोडिझेलची चोरटी विक्री करत असतांना मिळून आले. त्यांच्याकडून ६८ हजार रुपये किंमतीचे बायोडिझेल तसेच दोन वाहने असा १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून पुरवठा तपासणी अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.