यावल ( प्रतिनिधी ) – सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर यावल पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यावल तालुक्यातील सावखेडा सीम परिसरात बेकायदेशीर गोमांस विक्री होत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली होती.
पो नि सुधिर पाटील यांनी पोलीसांना सुचना देवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पो उ नि विनोद खांडबहाले, पोकॉ अनिल साळुंखे यांनी ३० डिसेंबररोजी कारवाई करत शेख कलीम शेख रशीद (वय-३२) याच्याकडून गोमांस जप्त करण्यात आले. पो.कॉ. अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.