पाचोरा ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा शैक्षणिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
या वेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, कुऱ्हाड हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.डी. बोरुडे, उपमुख्याध्यापिका सौ. प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. पाटील, ए .बी. अहिरे , कार्यालयीन अधिक्षक अजय सिनकर, धनराज सोनवणे , टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर , जितेंद्र पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.