जळगाव ( प्रतिनिधी ) – गुरांची अवैध वाहतूक करणा-या तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील हॉटेल दयानंद नजीक गुरांची अमानवी पद्धतीने वाहतूक करणा-या संशयीत आयशर या वाहनाला चाळीसगाव शहर पोलिसांच्या पथकाने अडवले. वाहनाची तपासणी केली त्यात गुरांची अमानवी पद्धतीने वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले आयशर (एमएच १८ बिजी ५३७७) वाहन जप्त करून तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आयशर चालक साहिल उर्फ सिकंदर खान (१८), मुक्तार उर्फ बबलू युसुफ खान (४०) (दोघे रा. मध्य प्रदेश ) तसेच गुरांचा मालक फिरोज (रा. सोनगीर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दीपक बिरारी करत आहेत.