पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील गोपीकमल फाउंडेशनतर्फे गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले . गोपीकमल फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल बाविस्कर व उपाध्यक्ष आणि सुरत येथील उद्योजक संदीप गिरासे यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबवण्यात आला
आपल्या गावाकडे गरजू लोकांना संस्थेमार्फत थंडीच्या दिवसात ब्लँकेट देण्यात यावी या संकल्पनेतून सचिव प्रशांत बाविस्कर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला गोपीचंद बाविस्कर व कमलबाई बाविस्कर (सेवानिवृत्त नायब तहसीलदार ) यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले . सूत्रसंचालन नगरसेवक पी. जी. पाटील यांनी केले. प्रशांत सिंधी, यशवंत चव्हाण, सनी सिंधी, महेंद्र पाटील, केतन पाटील, नीरज जाधव, कुंदन पाटील यांच्यासह दिवाज फॅशन स्टोअर (लेडीज फॅशन) व साई ड्रेसेस ( सुरत ) यांचे कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. आभार गोरख सूर्यवंशी यांनी मानले.