जळगाव ( प्रतिनिधी ) – जादूटोण्याच्या संशयातून शहरात महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे .
शिवाजीनगरातील एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह तापी नदीच्या पात्रात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव तालुका पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
माया दिलीप फरसे ( वय 51 , रा. क्रांतीचौक शिवाजी नगर ) या 15 तारखेपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी शोधाशोध करुनही त्यांचा तपास लागला नाही. त्यामुळे शहर पोलिसात तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यांचा मृतदेह विदगाव पुलाजवळ तापी नदी पात्रात मिळून आला. तपासात तालुका पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. दोघांनी हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. जादूटोणा प्रकारातून हा गुन्हा घडल्याची चर्चा आहे.