जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . चोपडा आणि जळगावात दोन उदघाटन सोहळ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही ते घेणार आहेत . त्यांच्या उपस्थितीत चोपड्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे .
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे यांचे उद्या सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी जळगाव विमानतळावर आगमन होईल . नंतर ते १० वाजता मोटारीने चोपड्यात पोहचतील . चोपड्यात शहरासाठी नगरपरिषदेने पूर्ण केलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे . त्यानंतर दुपारी १२ ते १ यावेळेत यावल रोडवरील पदममोहन मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत . या मेळाव्यानंतर दुपारी पावणे दोन वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते चोपडा तालुका सहकारी सूतगिरणीच्या जिनिंग प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे .
चोपड्यातील हे कार्यक्रम आटोपल्यानंतर जळगावात दुपारी सव्वा तीन वाजता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या इमारतीचे उदघाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे .या उदघाटन सोहळ्यानंतर दुपारी ४ ते साडे पाच या वेळेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्हा पोलीस मुख्यालयात नाशिक परिक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर विशेष पोलीस उप महानिरीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत . हा जिल्हा दौरा आटोपल्यावर सायंकाळी ७ वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत .