लासुर, ता. चोपडा : केंद्र सरकारचा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लासुर गावात स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८४ येथे लाभार्थ्यांचा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस ५ किलो याप्रमाणे मोफत तांदूळ वाटप करण्यात आला. यावेळी सरपंच जनाबाई माळी, तलाठी दिलीप तडवी, ग्रा. वि. अधिकारी विश्वनाथ चौधरी, स्वस्त धान्य दुकानदार दिलीप पालिवाल यांचा हस्ते लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करत करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य वासुदेव महाजन, राजेंद्र बिडकर, पत्रकार आत्माराम पाटील, कोतवाल सिराज तडवी आदी उपस्थित होते.