यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मारूळ येथील विवाहितेला नोकरी लावण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावेत, यासाठी मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काजल निलभूषण मेढे (वय-२०) यांचा विवाह यावल तालुक्यातील मारुळ येथील नीलभूषण पांडुरंग मेढे यांच्याशी झाला. पती निलभूषण मेढे याने लग्नात सन्मान केला नाही आणि नोकरी लावण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे. यासाठी विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासू, दीर व दोन नणंद यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता काजल मेढे या माहेरी निघून आल्या. सोमवारी दुपारी निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती निलभूषण मेढे, सासू लक्ष्मी मेढे, दीर निलंबर मेढ, नणंद सावित्री नराळे, दीर सत्यम मेढे आणि नणंद भाग्यश्री वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







