भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कजगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशोक पाटील यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली त्यांना नियुक्तीपत्र माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील , युवा तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील , आरिफ मलिक , अरुण सोनवणे, भूषण पाटील, अशोक सोनवणे , गोपी पाटील व मान्यवरांच्या हस्ते अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.