यावल ( प्रतिनिधी ) – शहरातील मोचीवाडा येथे नगरपालिकेचा नळ लावल्यावरून पत्नीसह तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण नारेकर (वय-४० , रा. बुरूज चौका, मोची वाडा ) हे कुटुंबियांसह राहतात. मजूरी करून उदरनिर्वाह करतात. १३ डिसेंबररोजी सकाळी शेजारी राहणारा रमेश हानवते याने नळ कनेक्शन लावल्याच्या कारणावरून प्रविण नोरकर याला धारदार शस्त्राने नाकावर वार करून जखमी केले. प्रविण यांच्या पत्नीला सुशीला हानवते आणि लिलाधर हानवते ( सर्व रा. मोचीवाडा ) यांनी दगड मारून दुखापत केली. प्रविण नारेकर यांनी यावल पोलीसात या तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांवरून रमेश हानवते, सुशिला हानवते आणि लिलाधर हानवते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो ना महेंद्र ठाकरे करीत आहेत .