जळगाव ( प्रतिनिधी ) – रस्त्याने मोबाईलवर बोलत चालणाऱ्या तरुणाचा कानाला लावलेला मोबाइल हिसकावून फरार झालेल्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडून आज जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचं ताब्यात दिले .
खेमराज हिवराळे ( वय १९ , रा – वाघनगर परिसर ) असे या चोरांचे नाव आहे . शिंदखेडा ( जि – धुळे ) येथील हर्षल पाटील हा तरुण शिव कॉलोनीतील गुरुकृपा नगरात राहतो . तो शिक्षणासाठी शहरात वास्तव्याला आहे . ३० नोव्हेंबर रावजी रात्री आठ वाजेच्या सुमारास हर्षल पाटील आय एम आर कॉलेज मार्गाने मोबाईलवर बोलत रस्त्याने चालत असताना दुचाकीवरून जवळ आलेल्या २ तरुणांनी त्याचा अचानक कानाला लावलेला १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावत पळ काढला होता . अंधारात लगेच ते भरधाव वेगात पसार झाले होते . हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या आरोपीला आता न्यायालयात हजर केले जाणार आहे .