भडगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित कनिष्ठ महाविद्यालयाचा नामकरण सोहळा नुकताच संपन्न झाला या कनिष्ठ महाविद्यालयाला आता सौ. जयश्री गणेश पूर्णपात्रे कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय असे नाव देण्यात आले आहे .
या महाविद्यालयाच्या नूतनीकरणांनंतर सर्व सुविधांनी सज्ज झालेल्या इमारतीचे उदघाटनही यावेळी करण्यात आले . या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ होते . नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन पद्मश्री अँड उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी नाशिक विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेतील आमदार डॉ. सुधीर तांबे , चेअरमन संजय वाघ, संस्थेचे मानद सचिव महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, माध्यमिक विभागाचे चेअरमन दत्तात्रय पवार, ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन विनय जकातदार, किमान कौशल्य विभागाचे चेअरमन विजय देशपांडे व सर्व संचालक मंडळ तसेच पूर्णपात्रे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सत्कार मूर्ती व दाते गणेश लक्ष्मण पूर्णपात्रे व सौ.जयश्री पूर्णपात्रे त्री यांच्या दातृत्वातून या महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले. आपण संस्थेचे व शाळेचे देणे लागतो या भावनेतून त्यांच्या नावाने कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले.
दीपप्रज्वलन सरस्वती प्रतिमा पूजन, व ईशस्तवन झाल्यांनतर प्रास्ताविक चेअरमन संजय वाघ यांनी केले. तत्पूर्वी दिवंगत मान्यवर व संस्थेचे संस्थापक यांना अभिवादन करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख सादर करण्यात . डॉ. सुनील कोरान्ने यांनी मनोगतातून श्री.व सौ.पूर्णपात्रे यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. श्री व सौ पूर्णपात्रे यांना सन्मानपत्र देण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना पूर्णपात्रे यांनी त्यांचा जीवनपट उलगडून दाखवत संस्था व शाळेचा अभिमान असल्याने माझ्या मनातील कल्पना आज साकार झाली. याचा आनंद असल्याची भावना व्यक्त केली विनय जकातदार यांनी श्री. व सौ. पूर्णपात्रे यांच्या योगदानाबद्दल संस्थेमार्फत आभार मानले. माजी आमदार दिलीप वाघ यांनीही या दाम्पत्याचे आभार मानले. आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल व शैक्षणिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.
सौ. पूर्णपात्रे यांनी यापुढे कला, विज्ञान व विभागातून प्रथम येणाऱ्या बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यास १,०००/- रुपयाचे बक्षीस जाहीर केले. माजी विद्यार्थी ल. बा. सोनार (चाळीसगाव) यांनी कनिष्ठ महाविद्यालयास दोन लाख रुपये देणगी जाहीर करून इ.१०वीत प्रथम येणाऱ्यास ५,०००/- रुपये बक्षीस जाहीर केले.
पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी सांगितले की मला या दाम्पत्याचा अभिमान वाटतो की, त्यांनी माझी शाळा एक “आई” समजून विद्यार्थी अवस्थेपासून वार्धक्यापावतो जीव लावला. त्यांच्या वर्तणुकीबद्दल, संभाषणाबद्दलही कौतुक केले.
प्राचार्य विश्वासराव साळुंखे, उपमुख्याध्यापक किशोर पाटील, पर्यवेक्षक अरुण पाटील, सुरेश पाटील, उपप्राचार्य संदीप सोनवणे , प्रसिद्धी प्रमुख एल.के.वाणी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिंण्य व अतुल सूर्यवंशी यांनी केले . ईशस्तवन व स्वागतगीत गायन शिक्षिका श्रीमती पुनम पाटील व पांडुरंग पाटील यांनी केले . आभार किमान कौशल्य विभागाचे चेअरमन विजय देशपांडे यांनी मानले.