जळगाव ( प्रतिनिधी ) – घरकुल घोटाळ्याच्या खटल्यात धुळ्यातील विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी भाजप नगरसेवक भगत बालाणी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे .

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जारी केलेल्या आदेशात पुढे म्हटले आहे की , या आधीही अशा शिक्षेला स्थगिती द्या अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत . असे असताना बालाणी यांच्याच शिक्षेला स्थगिती द्यावी अशी काही विशेष परिस्थिती दिसत नाही . बालाणी यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास म्हणजे त्यांची शिक्षा कायम ठेवल्यास त्यांच्यावर काय आणि कसा अन्याय होईल हे सांगणारी विशेष काही परिस्थिती दिसत नाही या याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारचे म्हणणे ऐकून घेताना सरकारच्या वकिलांनी गुन्ह्यातील बालाणी यांचा सहभाग या न्यायालयापुढे सिद्ध केलेला आहे . या पार्शवभूमीवर बालाणी यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे .
उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हातात आल्यावर वकीलांशी चर्चा करून आम्ही पुढे काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असे भगत बालाणी यांनी सांगितले .







