जळगाव ( प्रतिनिधी ) – नोकरीनिमित्त अमरावतीत राहणाऱ्या प्राचार्या कृष्ण कटुरिया यांचे लेक सिटी , मेहरूण भागातील घर फोडून चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीचे साहित्य आणि वाहनाचे आर सी बुक्सही लंपास केले होते . ही घरफोडी बाल गुन्हेगारांनी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही घरफोडी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील अल्पवयीन गुन्हेगारांनी केल्याची माहिती पो नि प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर दोन अल्पवयीन गुन्हेगारांना स फौ अतुल वंजारी , रामकृष्ण पाटील , सचिन मुंडे , किशोर पाटील , मुकेश पाटील , सचिन पाटील यांनी ताब्यात घेतले . त्यांनी चोरी केल्याचे कबूल केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला . घरफोडी करताना त्यांचेसोबत त्यांचा अजून एक अल्पवयीन साथीदार होता त्याचा शोध सुरू असून आज ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी बाल न्याय मंडळ येथे हजर केले बाल न्यायालयाने त्यांची रवानगी बाल निरीक्षण सुधारगृहात केली आहे या अल्पवयीन गुन्हेगारांवर यापूर्वी जामनेर व एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . त्यांची अल्पवयीन मुलांची टोळी आहे . त्यांना तांबापुर परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते.







