जळगाव (प्रतिनिधी) – शतपावली करित असताना अचानक तोल जाऊन घराच्या छतावरून पडून सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता संजीव भास्कर पाटील (६०, ऊदय काँलणी) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली़
जिल्हापेठ भागातील उदय कॉलनी येथे संजीव पाटील हे कुटूंबासह वास्तव्यास होते़ शुक्रवारी रात्री ८ वाजता जेवणानंतर ते घराच्या दुमजी इमारतीच्या छतावर शतपावली करित होते़ त्यामुळे त्यांना मोबाईलवर कॉल आला़ त्याचवेळी अचानक तोल जावून ते छतावरून खाली कोसळले़ यात त्यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आनले असता वेद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई , नातवंडे असा परिवार आहे़