चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाल्यामुळे कन्नड घाटातून आता अवजड वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे.
अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरडी कोसळल्यामुळे हा मार्ग बंद होता. काही दिवसांपासून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते. या अनुषंगाने १७ ते २७ नोव्हेंबरदरम्यान अजवड वाहतूक पुन्हा बंद करून, पर्यायी मार्गाने वळवली होती. महामार्ग प्राधिकरणाने २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत अवजड वाहतूक दुरुस्तीच्या कामाच्या वेळी दिवसा बंद केला होता तर रात्रीच्या वाहतुकीस मुभा देण्यात आली होती.
आता संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी बंद असलेला कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी आदेश काढले आहेत.