जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरिक्षक विनय भोईटे यांच्या दौर्यात पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
मनसे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे ४ व ५ डिसेंबररोजी जिल्हा दौर्यावर होते. कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, मुकुंदा रोटे, चेतन अढळकर, अनिल वाघ, कमलाकर घारू, विनोद शिंदे, राजेंद्र निकम आदींची उपस्थिती होती.
नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. भुसावळ विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष धीरज वाघमारे, तालुका सचिव विलास कोळी; मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्षपदी राहुल काळे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई, तालुका सचिव अतुल जावरे; जामनेर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्षपदी कल्पेश खैरनार, यावल तालुकाध्यक्षपदी जुगल पाटील, यावल शहर अध्यक्षपदी आकाश चोपडे, रावेर तालुकाध्यक्षपदी डॉ. मनीष फेगडे, अमळनेर विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्षपदी संदीप पाटील, तालुका सचिवपदी अरूण गव्हाणे, शहर अध्यक्षपदी धनू साळुंखे, शहर सचिवपदी आकाश महाले, धरणगाव तालुकाध्यक्षपदी राजू कोळी, तालुका सचिवपदी हेमंत महाजन, जळगाव तालुकाध्यक्षपदी हेमंत कोळी, तालुका सचिव भरत पाटील, गट अध्यक्षपदी उमेश धनगर, शैलेश चौधरी, नशिराबाद शहर अध्यक्षपदी जितेंद्र बर्हाटे, शहर सचिव अमोल माळी, चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी संग्राम शिंदे, शहर अध्यक्षपदी अण्णा विसपुते, भडगाव तालुकाध्यक्षपदी आबा पाटील, शहराध्यक्ष म्हणून सुनील सूर्यवंशी, पाचोरा तालुकाध्यक्षपदी शुभम पाटील, शहर अध्यक्षपदी ऋषिकेश भोई, एरंडोल तालुकाध्यक्षपदी विशाल सोनार, शहराध्यक्षपदी संदेश पाटील, पारोळा तालुकाध्यक्षपदी वसंत पवार यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.