पिंपळगाव हरेश्वर गावावर शोककळा
पाचोरा (प्रतिनिध) जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींना विहीरीत ढकलुन देवुन त्यांची क्रुर हत्या केल्याची घटना पिंपळगाव हरेश्वर येथे घडली त्यांनतर या पित्याने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी पित्या विरुद्ध पिंपळगाव (हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा येथील रहिवाशी विकास सुरेश ढाकरे (तेली) हे दि. २२ रोजी सकाळी ७:३० वाजता आपल्या तनुश्री (वय – १२) व परी (शिवन्या) (वय – ४) या दोन मुलींसह शेळ्यांना पाला घेण्यासाठी जवखेडा शिवारातील अरविंद केशवराव शिंदे यांच्या शेतात गेले होते. अरविंद शिंदे यांच्या शेतात असलेल्या विहीरी जवळ आल्यानंतर विकास ढाकरे यांनी तनुश्री व परी (शिवन्या) या दोन मुलींना विहीरीत ढकलुन दिले. नन्तर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलींना काय खाऊ घालु ? त्यांचे लग्न कसे होईल ? म्हणुनच ही टोकाची भुमिका घेतली अशी बतावणी विकास ढाकरे हे घटनास्थळी करीत असल्याची प्रत्यक्ष दर्शींमध्ये चर्चा होती.
या दोन्ही अल्पवयीन मुलींचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने विहीरीतुन बाहेर काढण्यात आले. व पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तनुश्री व परी यांचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. विकास ढाकरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पिंपळगाव (हरे.) पोलिस करीत आहेत