जळगाव ( प्रतींनिधी ) – आज आंतर्राष्ट्रीय दीव्यांग दिवसानिमित्त मध्य रेल्वे भुसावळ मंडळ द्वारा एस एस केडिया भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्या शुभ हस्ते ५० दिव्यांग रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराला भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले. त्यांना जीवनात उपयोगी होतील अशा विशेष वस्तू कर्मचारी लाभ निधी भुसावळ मधून भेट करण्यात आल्या ज्यामध्ये व्हील चेअर, हियरिंग हेड, वॉकिंग स्टिक आदींचा समावेश आहे.


या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना एस एस केडीया मंडळ रेल्वे प्रबंधक यांनी दिव्यांग रेल्वे कर्मचाऱ्याची प्रशंसा केली तसेच त्यांची कार्यकुशलता, आत्मविश्वास आणि कार्य करण्याची क्षमता विशेष उल्लेखनीय असल्याचे म्हटले आणि आत्मसन्मानाने जीवनात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा ही दिल्या.
या प्रसंगी रुकमैया मीणा आणि नवीन पाटील अप्पर मंडळ प्रबंधक यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कर्मचारी लाभ निधी चे अध्यक्ष तसेच भुसावळ मंडळ वरिष्ठ अधिकारी एन डी गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद करतांना सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्वावलंबी बनविणे हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन केले. बी एस रामटेके सहाय्यक कार्मिक अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमासाठी कर्मचारी लाभ निधीचे सदस्य जी जी ढोले, एस एस चौधरी, आर सी रावत, सनोज कुमार उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कल्याण निरीक्षकांनी अथक परिश्रम घेतले.







