खान्देशातील चौघांचा समावेश
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यात १७५ पोलीस उप अधीक्षकांच्या सहाय्यक आयुक्त पदांवर ( निशस्त्र ) बढतीने बदल्या करण्यात आल्या आहेत . गृह विभागाने आज या बढतीवर झालेल्या बदल्यांचे आदेश जारी केले .
या बढतीवर झालेल्या बदल्यांमध्ये खान्देशातील नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उप अधीक्षक पदावर बुलडाण्याहून आत्माराम प्रधान आले आहेत . धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातील सुनिल कुराडे यांची बदली ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर झाली आहे . धुळ्यातूनच अनंत तरंगे हे बढतीवर अकोला येथे उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून गेले आहेत . नंदुरबार येथील अविनाश मोरे यांची पुण्यात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली आहे .