जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० दुकानदारांना गुरूवारी दुपारी दंडात्मक कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत २४ तासाच्या आत लेखी खुलासा न दिल्यास दंड आकारण्यात येईल असा इशारा महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती लागू करून दुकान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदार यांचे पालन करत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उपायुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी दुपारी ३ वाजेदरम्यान तपासणी मोहीम राबविली . या मोहिमेत मॉल, दुकाने, हॉटेल्स व इतर ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे, ग्राहक व दुकानदारांनी लसीकरण न करणे आदी उणीवा दिसून आल्या .
बळीरामपेठेतील मनोहर साडीयॉ, श्री.जी. साडीयॉ, ओंकारेश्वर मंदीरसमोर वसंत सुपर शॉप, बाहिणाबाई उद्यानसमोरील नवजीवन प्लस, टॉवर चौकातील बॉम्बे सेल्स, नवीपेठेतील मनोहर शुज सेंटर, राजेश कलेक्शन, बळीराम पेठेतील नितीन फुट वेअर्स, संत कंवरराम क्लॉथ स्टोअर्स आणि आकाश एजन्सी अशा दहा दुकानदारांना १ लाख १० हजार रूपयांची दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहे. दुकानदारांनी २४ तासाच्या आत खुलासा महापालिकेन न दिल्यास आकारलेली दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी यांनी दिला आहे.