सावदा ( प्रतिनिधी ) – दोन कार आमने सामने धडकल्याने झालेल्या अपघातात मुलाच्या लग्नाच्या २ दिवस आधी अपघातात आई ठार झाली ! या अपघातात अन्य ५ जण जखमी झाले.
सावदा-आमोदा रस्त्यावर भरधाव फार्चुनर व इंडिका वाहनात समोरा-समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात वरमाय ( नवरदेवाची आई ) असलेली महिला जागीच ठार तर पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. या अपघातानंतर वाघोदा येथील लग्नघरी शोककळा पसरली आहे. भावना भरत सुपे (40, वाघोदा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्या माजी उपसभापती भरत सुपे यांच्या पत्नी होत. दरम्यान, 5 रोजी भावना सुपे यांच्या मोठ्या मुलाचे लग्न असल्याने तयारी सुरू असतानाच अपघाताचे वृत्त धडकल्याने लग्नघरी शोककळा पसरली.