जळगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथे सापडलेल्या अनाथ बालकाच्या पालकांनी महिनाभरात पोलिसांशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा त्याच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल , असे जळगावच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वनिता सोनगत यांनी सांगितले .
जुवार्डी ( ता. भडगाव ) येथील प्लॉट भागात 20 दिवसांचा मुलगा निराधार अवस्थेत सापडला होता . त्याला भडगाव पोलिसांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले व बालकल्याण समितीला माहिती दिली. औरंगाबादच्या बालकल्याण समितीच्या आदेशाने या बालकास 14 ऑक्टोबररोजी भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याचे यश असे नामकरण करण्यात आले आहे. यशचे पालक व नातेवाईकांनी 30 दिवसांच्या भारतीय समाज सेवा केंद्र, अनिकेतन, प्लॉट क्रमांक 151, सर्वे क्रमांक 15, बी. एस. जी. एम. शाळेसमोर, गुरू सहानी नगर, एन/4, सिडको, औरंगाबाद, दूरध्वनी : 0240- 2453922, किंवा अध्यक्ष, बालकल्याण समिती, द्वारा, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, एन-12, ताज हॉटेलच्या मागे, हडको, औरंगाबाद, किंवा अध्यक्ष, बालकल्याण समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, जिल्हा पेठ, जळगाव, दूरध्वनी 0257- 2239550, पोलिस निरीक्षक, भडगाव पोलिस ठाणे दूरध्वनी : 02562- 213333 येथे संपर्क साधावा.
या कालावधीत संबंधितांनी संपर्क न साधल्यास यशच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने घेवू शकेल, असे वनिता सोनगत, सदस्य सचिव, जळगावच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.