जळगाव ( प्रतिनिधी ) – रिंगरोड परिसरातील चिल्ड्रन हॉस्पिटलच्या पर्किंगमधून १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
विशाल लक्ष्मण सोनार (वय-२१ रा. अयोध्या नगर ) हा रिंगरोडवरील चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये कामानिमित्ताने २४ नोव्हेंबररोजी सकाळी दुचाकीने (एमएच १९ बीएच ६९४९) ने आले. त्यांनी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती. काम आटोपून दुचाकीजवळ गेले असता दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध केली तरीही मिळाली नाही. २७ नोव्हेंबररोजी जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना भरत चव्हाण करीत आहेत .








