चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव – कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ भिषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज उघडकीला आली ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१२- वरील चाळीसगाव – कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेलजवळ झालेल्या अपघातात हर्षल संतोष ठाकरे (वय-२८ , रा. सांगवी ता. चाळीसगाव) व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल सहा (वय-२२, रा. धनसनि भांदलगाव, राज्य उत्तराखंड) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीला आली आहे. माहिती मिळताच पो नि संजय ठेंगे यांनी घटनास्थळी पाहणी केली.
प्राथमिक माहितीनुसार हर्षल ठाकरे हॉटेलवर कामे करून उदरनिर्वाह करीत होता. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पो नि संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार तपास सुरू आहे.