अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील लोण खु. येथील अतिक्रमणाच्या वादात ११ जणांविरुद्ध मारवड पोलिसात मारहाण केल्याप्रकरणी दंगलीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी समाधान शिंदे ( रा. लोण खु. ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १८ नोव्हेंबररोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी विकास शिंदे, बापू पाटील, साधना पाटील, महेंद्र शिंदे, निलेश शिंदे, चूनीलाल पाटील, बापू पाटील, आदित्य पाटील, संदीप पाटील, सुशिल पाटील, ज्ञानेश्र्वर पाटील यांनी प्रवेश करून लाकडी काठ्या व लोखंडी सळई घेत फिर्यादी व त्याच्या घरच्यांना मारहाण केली. ८फिर्यादीचे वडील गुलाबराव पाटील यांना लोखंडी सळईने मारत दात पाडला पाठीवर बुक्क्यांनी मारहाण करत डोकेही फोडले. फिर्यादीला व त्याच्या चुलत आजीला चापट बुक्क्यांनी मारहाण करत साडी फाडली त्यावरून या अकरा आरोपींविरुद्ध मारवड पोलिसात भादवि कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ४२७ अन्वये तसेच म.पो. अधि. कलम ३७ १,३ चे उल्लंघन केल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे कॉ. भटूसिंग तोमर करीत आहेत.