जळगाव ( प्रतिनिधी ) – गोलाणी मार्केट परिसरातून तरूणाचा १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
रोहन भानुदास पाटील (वय-३५ , रा. दांडेकर नगर, पिंप्राळा ) ११ नोव्हेंबररोजी दुपारी कामाच्या निमित्ताने गोलाणी मार्केट परिसरातील दुकान नं. २७८ येथे आला होता. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशांत असलेला १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी परिसरात मोबाईलची शोधाशोध केली परंतू आढळून आला नाही. आठ दिवसानंतर १९ नोव्हेंबररोजी दुपारी शहर पोलीसात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना प्रफुल्ल धांडे करीत आहे.