जळगाव ( प्रतिनिधी ) – कुसुंबा – रायपूर फाट्याजवळ घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील रायपूर फाट्याजवळ पान टपरीमध्ये दोन जण घरगुती गॅसचा काळाबाजार करत असल्याची गोपनिय माहिती पो नि प्रताप शिकारे यांना मिळाली. शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी छापा टाकला. ३ हजार ६२० रूपये किंमतीचे ४ भारत गॅस कंपनीचे सिलिंडर्स , ९०५ रूपये किंमतीचे रिकामे सिलिंडर , ७ हजाराचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि १२ हजार रूपये किंमतीचे गॅस भरण्याचे मशिन असा २३ हजार ५२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी भुषण प्रदिप तोमर (वय-२३, रा. कुसुंबा ता. जळगाव ) आणि अंबादास मंगलसिंग जाधव (वय-५० , रा. सुप्रिम कॉलनी ) या दोघांना ताब्यात घेतले पोहेकॉ गफ्फार तडवी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोउनि अनिस शेख करीत आहेत.