मुंबई ( प्रतिनिधी ) – राज्यातील मार्च २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या जि . प . , प . स .च्या निवडणुकांसाठी गट , गण रचना ३० नोव्हेम्बरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जि . प . , प . स .च्या निवडणुकांसाठी गट , गण रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षणासाठीच्या सोडती होणार आहेत . त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या तारखा जाहीर होतील . आता जि . प . , प . स .च्या निवडणुकांसाठी गट , गण रचना अंतिम करताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्या – त्या जिल्ह्यांची २०२१ सालातील जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घ्यावी , अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे . लोकसंख्येच्या निकषानुसार आता जि . प . , प . स .च्या निवडणुकांसाठी गट , गण संख्येत वाढ होऊ शकते असा राजकीय पक्षांचा अंदाज आहे . जि . प . , प . स .च्या निवडणुकांसाठी गट , गण संख्या , ओबीसीसाठी द्यावे लागणारे आरक्षण व एकूण आरक्षणाचे ५० टक्के प्रमाण विचारात घेऊन ही कार्यवाही होणार असली तरी ती न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे . आरक्षण निश्चिती आणि सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून राज्याच्या प्रशासनाला दिला जाणार आहे , डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आरक्षणाच्या सोडती जाहीर होण्याची शक्यता आहे . आरक्षण सोडती जाहीर होईपर्यंत गट आणि गणांची रचना गोपनीय ठेवली जाणार आहे . गट आणि गणांच्या नव्या रचनेला संबंधित विभागीय आयुक्त मान्यता देणार आहेत.