मुंबई ( प्रतिनिधी ) – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकले आहे. या गुन्ह्यात शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात 1.51 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा एफआयआर दाखल केला आहे. नितीन बरई यांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शिल्पा आणि राज यांच्यावर 1.51 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2014-2015 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून 1.51 कोटींची फसवणूक केल्याचे नितीन बोरई यांचं म्हणणं आहे.
वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध कलम 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी बऱ्याच दिवस राज कुंद्रा तुरुंगात होता. राज कुंद्राची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजने मीडियापासून अंतर ठेवलं आहे. राज मीडियासमोर येत नाही. त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले आहे.