जळगाव ( प्रतिनिधी ) – हरीविठ्ठलनगरातील ३० वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

अनिल विठ्ठल हिरे (वय-३० , रा. हरी विठ्ठल नगर ) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. हरीविठ्ठल नगरात अनिल हिरे कुटुंबियांसह वास्तव्याला होता गुरूवारी रात्री घरात कुणीही नसतांना घर बंद करून दोरीने गळफास घेवून त्याने आत्महत्या केली. त्याची पत्नी घरी आल्यावर ही आत्महत्येची घटना उघडकीस आली त्यांच्या आत्महत्येचे कारण लगेच समजू शकले नाही शेजारील नागरीकांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरवला व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णायात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर यांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास विजय खैरे करीत आहेत.







