चेन्नई;- एका पत्रकारासह 25 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असताना चेन्नईतही पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार 90 हून अधिक लोकांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात 25 लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. चेन्नईत एका पत्रकाराला लागण झाली होती. त्यानंतर 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संस्थेतील पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आहे कळताच लाईव्ह शोही बंद करण्यात आला.
संस्थेतील सर्व कर्मचार्यांची टेस्ट घेण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 27 वर पोहोचू शकते. सर्व कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल केले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणयत आले आहे.