जळगाव ( प्रतिनिधी )– राज्याप्रमाणे जळगावातही सुरु असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर स्थानिक पोलीस लक्ष ठेऊन आहेत.
राज्यात एस टी कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने जळगाव बस स्थानक आणि आगाराला आज पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली , आंदोलक कर्मचाऱ्यांना समक्ष भेटून पोलिसांनी चर्चाही केली . आंदोलन शांततेत असावे , कोणीही कायद्याचा भंग करणार नाही , याची कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी , अशा सूचना यावेळी देण्यात आल्या एस टीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना देऊन 10 कर्मचाऱ्यांना 149 सीआरपीसीप्रमाणे नोटीस देण्यात आली आहे . जळगावातील मध्यवर्ती बस स्थानकावर स पो नि पवार यांच्यासह 4 पोलीस कर्मचारी व गुप्त वार्ता विभागाचे 3 कर्मचारी नेमले आहेत पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत सध्या तरी हा संप जळगावात शांततेत सुरु आहे .