माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांच्या अर्जाला अधिकृत दुजोरा
जळगाव ( प्रतिनिधी ) – भडगाव तालुक्यातील गुढे प्रार्थमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या जुवारडीच्या उपकेंद्रातील तृतीयश्रेणी कर्मचारी संदीप पाटील ५ वर्षांपासून अनधिकृत गैरहजर असल्याचे उघडकीस आले आहे . या कर्मचाऱ्यासह त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे
जुवारडीच्या उपकेंद्रातील आरोग्यसेवक कर्मचारी संदीप रतन पाटील हा १२ ऑगस्ट, २०१६ पासून वरिष्ठांना काहीही पूर्वकल्पना न देता किंवा नियमाप्रमाणे रजा मंजूर करून न घेता गैरहजर आहे . दिनेश भोळे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार गुढे प्रार्थमिक आरोग्य केंद्रांकडून माहिती मागितल्यानंतर या कर्मचाऱ्याच्या बेकायदा गैरहजेरीबद्दल तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही २६ ऑक्टोबर रोजी लेखी दुजोरा दिलेला आहे . या कर्मचाऱ्याला नियमाप्रमाणे नीळमित किंवा बडतर्फ करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे