जळगाव ( प्रतिनिधी ) – प्राचीन परंपरा व शहराचे श्रद्धास्थान असलेली रथाची मिरवणूक येत्या १५ नोव्हेंबर रोजी निघणार आहे . मात्र या रथाच्या मार्गाच्या डागडुजीतही ‘ हुशारी ‘ केली जात असल्याचे पाहून रथचौक भागातील नागरिक महापालिकेवर संतापले आहेत .
रथचौक परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे येथील रस्ते बऱ्याच दिवसांपासून खराब अवस्थेत आहेत . आधी ड्रेनेजचे काम आणि आता अमृत योजनेच्या कामांमुळे पूर्ण शहरातच रस्त्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे .
रथोत्सवाच्या पार्शवभूमीवर किमान रथाची मिरवणूक ज्या मार्गावरून जाते त्या जवळपास साडेतीन किलोमीटर रस्त्याची तरी मजबुतीकरणाशी दुरुस्ती व डांबरीकरण रथोत्सवापूर्वी करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात होती . त्याची दाखल घेऊन महापालिकेने कामाला सुरुवात केली खरी पण दर्जेदार कामाच्या नावाने बोंबच असलयाचे दिसून येत असल्याने स्थानिक रहिवाशी संतापले आहेत
आज या कामावर आक्षेप घेत काम बंद पडल्यावरपण कुणीतरी दोन जण आले आणि आम्ही महापालिकेतून आलो आहोत असे त्यांनी सांगितले . या दोघांनी त्यांची ओळख सांगण्यास मात्र नकार दिला . आम्ही आधी मुरूम टाकून पाणी मारून मोठी खडी टाकल्यावर रोलर फिरवणार आहोत त्यानंतर बारीक खडी दाबून डांबरीकरण केले जाईल , एवढे सांगून ते निघून गेले . या दोघांनी त्यांची ओळख का लपविली ? , हा प्रश्न पडल्याने स्थानिक रहिवाशी पुन्हा चिडले आहेत . हे काम महापालिका स्वतः करते आहे की कुणी ठेकेदार करतो आहे ? , या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने लोकांचा संशय आणखी वाढला आहे . , असे
हिंदुत्व स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महासचिव मयुर बारी व येथील नागरिकांनी सांगितले .
रथाच्या प्रचंड गर्दीच्या मार्गाच्या कामातही महापालिका असा संवेदनाशून्य कारभार करीत असेल तर हे शहरावासीयांचेच दुर्दैव समजायचे का ? असा संताप व्यक्त केला जात आहे .
रथचौक येथील नागरिक रवी ठाकूर, मुनेश बारी, परशुराम सपकाळे, राजू वाणी, जयंत वाणी, जगदीश निकम, शुभम विसपुते, मंदार वाणी, अनंत निकम , कृष्णा शिंपी ( स्थापत्य अभियंता .), दिनेश माने , सुरेश वाणी, हरीश वाणी आदीनी या थातुरमातुर कामाबद्दल हरकत घेतली आहे.