नवी दिल्ली : करोनासोबतच खोट्या बातम्या आणि अफवांना देखील पेव फुटला आहे. तसेच पालघर प्रकरणांना देशातील काहीजण धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर काही युजर्सद्वारे करोनाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. ज्यामुळे देशात हिंसक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी भाष्य केले आहे. तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मंडळींवर संताप व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले,’जे बाहेरचे देश भारतातील मुस्लीम समाज धोक्यात असल्याची भाषा करत आहेत, त्यांनाही नक्वी यांनी उत्तर दिले आहे.भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत
ते पुढे म्हणाले,’धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द’ ही ‘राजकीय फॅशन’ नसून भारत आणि भारतीयांसाठी ‘परिपूर्ण पॅशन’ आहे. या सर्वसमावेशक संस्कृती आणि दृढ वचनबद्धतेमुळेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला विविधतेतील एकतेच्या धाग्यात बांधला आले आहे. अल्पसंख्याकांसह देशातील सर्व नागरिकांचे घटनात्मक, सामाजिक, धार्मिक हक्क ही भारताची घटनात्मक व नैतिक हमी आहेत.