जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतून आज माजी खासदार ए टी नाना पाटील यांची आश्चर्यजनक माघार झाल्याने पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे .
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपकडून अर्ज दाखल केलेल्या कोणत्याच उमेदवाराने आतापर्यंत माघार घेतलेली नसल्याने माघार घेणारे माजी खासदार ए टी नाना पाटील हे पहिलेच ठरले आहेत . उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी खासदार ए टी नाना पाटील यांनी आपण राजकारणात सक्रिय आहोत , भाजपपासून दूर जाण्याचा प्रश्नच नाही , कोरोनामुळे सगळे शांत होते. मी पण शांत होतो , पक्षाशी बांधील आहे , असे स्पष्ट सांगितले होते . त्यावरून ते जिल्हा बँकेची निवडणूक लढवतील असे समजले जात होते . मात्र आज अचानक त्यांनी माघार घेतली . त्यांनी माघार घेण्याचे नेमके कारण लगेच समजू शकले नसले तरी भाजपने त्यांना उमेदवारी देणे नाकारले असावे ? असा एक मतप्रवाह चर्चेत आहे , दुसरीकडे आता भाजपकडून करणं पवार यांना उमेदवारीचे मजबूत दावेदार मानले जाते आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.