जळगाव ( प्रतिनिधी ) – दिवाळी सणासोबत भाऊबीज हा प्रेमाचे नाते जपणारा सण सर्वदूर साजरा केला जातो . समाजासाठी काम करणाऱ्या जळगावच्या नारीशक्ती ग्रुपने भाऊबीज दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरी केली .
दिव्यांग विद्यार्थ्यांना करदोळा व श्रीफळ, टॉवेल देत ओवाळून ही भाऊबीज साजरी केली. याप्रसंगी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, महापौर जयश्री महाजन , नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा मनिषा पाटील, सुमित्रा पाटील, नूतन तासखेडकर , भारती कुमावत , ॲड वैशाली बोरसे, माधुरी शिंपी , माधुरी जावळे , रेणुका हिंगु , अश्विनी पाटील आदी उपस्थित होत्या.