जळगाव ( प्रतिनिधी ) – कांचननगरातून १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली आहे. शनीपेठ पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचननगरात एकनाथ शंकर राजपूत (वय-४६) कुटुंबियांसह राहतात. बांधकामाच्या ठिकाणी मजूरीचे काम करतात. कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एझेड २१७५) क्रमांकाची दुचाकी आहे. ३ नोव्हेंबररोजी सायंकाळी ते कामावरून दुचाकीने घरी आले. दुचाकी घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. एकनाथ राजपूत यांनी परिसरात दुचाकीची शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. शनीपेठ पोलीसात त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना विजय निकम करीत आहेत .