मुंबई ( वृत्तसंस्था ) – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी भंगारच्या माध्यमातून तीन हजार कोटींची प्रॉपर्टी कशी जमवली ? असा सवाल करत भाजप नेते मोहित कंबोज यांनी करत त्यांच्यावर टीका केली आहे.
भाजप नेते मोहित भारतीय (कंबोज) यांनी आज नवाब मलीक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मलिक यांच्याकडे ३ हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण २२ संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं भारतीय म्हणाले.
कंबोज म्हणाले की, नवाब मलिक यांची मी सगळी पोलखोल करणार आहे. त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. उत्तरे देण्याचीही त्यांची लायकी उरलेली नसेल, असं सांगतानाच राज्यात सलीम-जावेदने चित्रपट सुरू केला होता. त्याचा द एन्ड मीच करणार. आज सलीम-जावेदच्या चित्रपटाची खरी स्क्रिप्ट आणि खरा चेहरा जगासमोर येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, मलिक यांनी आमच्यावर १०० आरोप केले. पण एकाही आरोपावर पुरावा दिला नाही. ते खासगी त्रासाचा सूड उगवत नाही का? त्यांचे नॅरेटिव्हज सर्व खोटे आहेत. असं राजकारण यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले. माझ्या कुटुंबावर आरोप होत होते. तेव्हा भाजपने मला साथ दिली, असंही त्यांनी सांगितलं.