नाशिक (प्रतिनिधी ) – नाशिकमध्ये ऐन दिवाळीत महिलेची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली मृत महिलेचं नाव पूजा आंबेकर आहे. रात्री ११ वाजेदरम्यान किरकोळ कारणातून दिराने धारदार चाकूने २५ सपासप वार करत भावजयीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या महिलेचा पती संतोष आंबेकर याच्यावर दोन खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तो तुरुंगात आहे. तो काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. मृत महिला पूजा आंबेकर पतीपासून काही दिवसांपासून वेगळी राहत होती. ती दिर संतोष आंबेकरसोबत २० दिवसांपासून खोली भाड्याने घेऊन राहू लागली. बुधवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. राग अनावर झाल्याने संतोषने पूजावर धारदार चाकूने सपासप वार केले.
संतोष आंबेकर घटनास्थळावरुन पळून गेला. पोलिसांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले.संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.