विभागीय सहनिबंधकाचा निर्वाळा
औरंगाबाद ( प्रतिनिधी ) – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत अवैध ठरवलेले भाजपच्या नऊ उमेदवारांचे सहकारी विभागीय सहनिबंधकाकडे झालेल्या सुनावणीत वैध ठरले आहेत.
या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे तर महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 21 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं सर्व 19 जागांसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
10 ऑकटोबर रोजी झालेल्या अर्जाच्या छाननीत भाजप उमेदवारांचे सर्व अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. या निर्णयाविरुद्ध भाजपनं विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील केलं होतं. या अपिलाची सुनावणी होऊन नऊ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. काँग्रेसच्या राजकीय दबावात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद करून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत राज्यपालांकडे देखील भाजपनं तक्रार केली होती. या निर्णयामुळं सत्य परेशान हो सकता हैं पराजित नहीं, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार रमेश कराड यांनी दिली